भारतात मंकी पॉक्सचा रुग्ण ! केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
भारतात मंकी पॉक्सचा रुग्ण ! केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
img
दैनिक भ्रमर
जगभरात कोरोना प्रमाणेच आता मंकीपॉक्समुळे चिंता वाढताना दिसत आहे. दरम्यान , भारतात मंकी पॉक्स आजाराचा भारतात रुग्ण आढळला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मंकी पॉक्स आजाराचा संशयित रुग्ण चेन्नईत आढळला आहे. त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. हा आजार वेगाने प्रसारीत होत असल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना मार्गदर्शनपर सूचना जारी केल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मंकी पॉक्स साथीला इमर्जन्सी म्हणून जाहीर केलेले आहे. त्यातच आता केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

मंकी पॉक्सच्या संशयित रुग्णांचे विलगीकरण करावे, सर्व राज्य सरकारांनी नागरिकांमध्ये मंकी पॉक्सविषयी जागरूकता वाढवावी, मंकी पॉक्सविषयीची माहिती,संसर्गाची माध्यमे याविषयी लोकांना जागरूक करावे, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्य आणि जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणेची पाहणी करुन ती सुसज्ज करावी, रुग्णालयात मंकी पॉक्सचे रुग्ण तसेच संशयित यांच्या विलगीकरणाराच्या, त्याची ने-आण करण्याच्या सुविधा आहेत का?, याची खातरजमा करावी, संशयित रुग्णांचे नमुने विहित प्रयोगशाळांना पाठवण्यात यावेत तसेच पॉजिटीव्ह आढळणाऱ्या रुग्णांचे नमुने ICMR ला जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जावेत, सध्या देशभरात 36 प्रयोगशाळा आणि तीन PCR किट्सना तपासणीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group