धार्मिक यात्रेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
धार्मिक यात्रेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
img
दैनिक भ्रमर
धार्मिक यात्रेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीच अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची दुर्दैवी घटना तामिळनाडूच्या वेल्लाकोवीलमध्ये घडली.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. अनेक ठिकाणी महिला एकटीपाहून तिच्यावरअत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी या गुन्ह्यातील 7 आरोपींना अटक केली आहे. 9 मार्चला पीडित मुलगी तिच्या गावी एका मंदिरातील रथ यात्रेत सहभागी होण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. 

मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरुन तामिळनाडू पोलिसांनी दोन पथके तयार केली. एका टीमने कामराजपूरम येथून 32 वर्षीय आणि दुसऱ्या 29 वर्षीय आरोपीला अटक केली. या दोन आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारावरुन अन्य आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली. सदर प्रकरणी पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरु आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group