नवीन वर्षात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार ! सलून-ब्युटी पार्लर सेवेत
नवीन वर्षात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार ! सलून-ब्युटी पार्लर सेवेत "इतक्या" टक्क्यांनी दरवाढ
img
Dipali Ghadwaje
वर्धा :  नवीन वर्षातील पहिल्या महिन्यात सलून ब्युटी पार्लर असोसिएशन नाभिक संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. नाभिक संघटनेच्या या निर्णयाने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. या संघटनेच्या सलून व्यावसायिकांनी २० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

२६ जानेवारीपासून ही दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महागाईसोबतच सलून ब्युटी पार्लरमध्ये लागणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाल्यानं दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

संघटनेच्या निर्णयानंतर आता साधी कटिंग १०० रुपये तर सादी दाढीकरिता ७० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच इतर बाबीतही दरवाढ करण्यात आली आहे.

सलून ब्युटी पार्लर असोसिएशन नाभिक संघटनेचे जवळपास ६०० सदस्य आहेत. संघटनेच्या निर्णयाने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. सलून सेवेच्या दरवाढीची माहिती सलून ब्युटी पार्लर असोसिएशनने पत्रकार परिषदेत दिली.

सलून ब्युटी पार्लर असोसिएशन नाभिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश अतकरे म्हणाले की, '२६ जानेवारीपासून सलून सेवेची दरवाढ होणार आहे. सर्व ठिकाणी महागाई वाढली आहे. या महागाईनुसार सलून सेवेचे दर वाढणार आहे'. 'वीज, घरभाडे, करभाडे, सलून साहित्यावरील दरवाढ झाली आहे.

या महागाईचा बोझा हा सलून व्यवसायावर पडत आहे. त्यामुळे आम्ही दरवाढ करत आहोत. आमच्या कुटुंबाचा पालणपोषणाचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे दरवाढ करत आहोत. ही दरवाढ २६ जानेवारीपासून होणार आहे. महागाईनुसारच दरवाढ करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

असे असणार आता कटिंग दाढीचे दर : 
  • साधी कटिंग 100
  • प्रोफेशनल कटिंग 120
  • साधी दाढी 70
  • डेनिम दाढी 80
  • वेगवेगळ्या प्रकारचे मसाज - 80 रुपयापासून 350 रुपयांपर्यंत
इतर बातम्या
Join Whatsapp Group