मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे.राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीच यासंदर्भात माहिती दिली आहे.
जानेवारी 2025 महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून, 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे,असे ट्विट अदिती तटकरे यांनी केलं आहे.
त्यामुळे आता सातव्या महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी 1 कोटी 10 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा निधि जमा झाल्याचे त्यांनी नमूद केलं. उद्यापर्यंत (26 जानेवारी) सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, असेही त्यांनी नमूद केलं
आत्तापर्यंत किती महिलांना पैसे मिळाले ?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जुलै ते डिसेंबर असे प्रत्येक महिन्याचे 1500 मिळून एकूण 9 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यभराती सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजेनचा लाभ घेतला आहे. तर जानेवारीचा हप्ताही आता जमा होत असून सात महिन्यांचे मिळून एकूण 10 हजार 500 रुपये पात्र महिलांना मिळतील.