"माझ्या ४ पिढ्यांची कुणबी नोंद, आता जरांगेंवर मराठा आरक्षणासाठी उपोषणाची वेळ येणार नाही"
img
Dipali Ghadwaje
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलनाचा लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यसरकारने दोन महिन्यांची मुदतवाढ घेतली आहे. यानंतर राज्यभरात मराठा कुणबी नोंदी असलेले पुरावे शोधण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे .

दरम्यान, हिंगोलीमध्ये भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या कुटुंबातील चार पिढ्या जुने मराठा कुणबी नोंद असलेले पुरावे सापडलेत. त्यामुळे आता मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळणार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही, असा दावा मुटकुळे यांनी केला आहे. 

मराठा समाज कुणबी असल्याचा दाव्याला खरा ठरवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात पुष्टी मिळालेली असतानाच आता पंढरपूर तालुक्यातील दहा गावांमध्ये जवळपास ५५० मराठा कुणबी अशा नोंदीचा जूना दस्तावेज हाती लागला आहे.

मुख्यमंत्र्यांनी जूने दस्तावेज तपासणीचे आदेश दिल्यानंतर आज पंढरपूर येथील तहसील कार्यालयात जूने दस्तावेज तपासणीचे काम सुरू आहे. त्यामध्ये एकाच भोसे गावात २५० मराठा कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत तर तालुक्यातील इतर दहा गावांमध्ये सुमारे ५५० नोंदी सापडल्या आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group