येवला (दीपक सोनवणे) : एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार येवल्यात उघडकीस आला असून याप्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून येवला शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येवला शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारेगाव रोड परिसरात राहणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणीवर दोघा तरुणांनी लैंगिक अत्याचार केले.
तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सदर तरुणी 2019 मध्ये एफ वाय बी ए शैक्षणिक वर्षात शिकत असताना आणि त्यानंतर संशयित आरोपिंनी या तरुणीवर वारंवार अत्याचार केले.
येवला शहर व परिसरातील विविध हॉटेल मध्ये नेवून अत्याचार केला. यातून ही तरुणी गर्भवती राहिल्याने येवल्यातील कोटमगाव रोड परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये केला गर्भपात देखील केला असा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला असून तरुणीच्या तक्रारीहुन शहर पोलिसांनी वसीम सय्यद, आरिफ खान व राज सय्यद यांना अटक करण्यात आली आहे.
तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज मेढे करत आहेत.