नवीन वर्षात पोलीस दलात मोठा बदल, रश्मी शुक्ला होणार राज्याच्या पोलीस महासंचालक ?
नवीन वर्षात पोलीस दलात मोठा बदल, रश्मी शुक्ला होणार राज्याच्या पोलीस महासंचालक ?
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली  : केंद्रीय सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुख रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची निवड करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे.

रश्मी शुक्ला लवकरच राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचा कार्यकाळ संपत असल्याने शुक्ला यांची महासंचालक पदावर निवड होण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला या 1988 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.

त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू मानल्या जातात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने शुक्ला यांची चौकशी सुरू केली होती. एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत देखील दिली होती. त्यामुळे रश्मी शुक्ला वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या.

अनेकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फोन टॅपिंगच्या प्रकरणातील त्यांच्या विरोधातील चौकशी बंद झाली होती.


इतर बातम्या
Join Whatsapp Group