मविआच्या मुख्यमंत्रीपदा बाबत सुप्रिया सुळेंनी केलं मोठं विधान म्हणाल्या ...
मविआच्या मुख्यमंत्रीपदा बाबत सुप्रिया सुळेंनी केलं मोठं विधान म्हणाल्या ...
img
दैनिक भ्रमर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत . प्रत्येक पक्ष निवडणुकांसाठी चांगलीच जोरदार तयारी करत आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत प्रचंड घडामोडी घडत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

सुप्रिया सुळे यांनी यावेळी महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश आलं तर मुख्यमंत्री कोण होईल किंवा आगामी निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपचं सरकारन बनणं कठीण आहे. निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार बनेल, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचा कुणी नेता मुख्यमंत्री बनेल. आमचा पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर आहे. आम्हाला कोणत्या पदाची इच्छा नाही”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

दरम्यान,काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. तिथे जावून त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तसेच उद्धव ठाकरे यांनी काही आप पक्षच्या नेत्यांची देखील भेट घेतली होती. याशिवाय राज्यातही महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या विधानसभेच्या जागावाटपासाठी बैठका पार पडत आहेत. या बैठकांमध्ये जागावाटपावर चर्चा होत आहे. तर दुसरीकडे मविआत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? याबाबत वेगवेगळे दावे नेत्यांकडून केला जातोय. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group