मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्त्वात केला जाईल. मात्र मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीनंतर जाहीर होईल, अशी स्पष्टोक्ती भाजप खासदार अशोक चव्हाणांनी दिली. एका वृत्त संस्थेशी बोलताना त्यांनी महायुतीतील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावर वक्तव्य केलं.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार महायुती सरकार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. निवडणुकीच्या निकलानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? हे महायुतीतील सर्व पक्ष एकत्रीत ठरवतील. विधानसभेला कोणाला किती जागा मिळाल्या हे पू्र्णपणे तेथील परिस्थितीवर अवलंबून आहे. जिथे ज्या पक्षाची जिंकण्याची शक्यता जास्त आहे त्या पक्षाला ती जागा दिली पाहिजे.