पुण्यात केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांना पेपर आधीच मिळाला होता, असा आरोप कऱण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोपामुळे युपीएससीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. पूजा खेडकर प्रकरणामुळे युपीएससीची बदनामी झाली होती. आता पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आलेय.

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी परीक्षेतील आणखी एक घोटाळा उघड झाला आहे. युपीएससीच्या नागरी सेवांसाठीच्या मुख्य परीक्षेतील निंबध आधीच प्रसिद्ध झाल्याचा आरोप पुण्यातील विद्यार्थ्यांनी केला आहे. देअर इज नो पाथ टु हॅपिनेस, हॅपिनेस इज द पाथ…हा निंबध खासगी क्लासने आधीच प्रसिद्ध केला होता. हाच निंबधाचा विषय युपीएससीच्या पूर्व परीक्षेत जसाच्या तसा आला, अशा आरोप विद्यार्थ्यांनी केल आहे.
खासगी क्लासने प्रसिद्ध केलेला निंबधाचा विषय जसाच्या तसा युपीएससीच्या परीक्षेत आल्याने पुण्यातील विद्यार्थ्यांनध्ये खळबळ माजली. निंबधाचा विषय १२५ मार्कांसाठी आहे. विद्यार्थ्यांनी या विरोधात पुण्याच्या जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
युपीएससीच्या नागरी सेवांसाठीच्या पुर्व परीक्षेचा हा पेपर आजच झाला आहे. आजचा निंबधाचा पेपप रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. खासगी क्लासचा निंबधाचा विषय युपीएससीच्या परीक्षेत कसा आला? याची चौकशी करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली.