राज्यात बहुचर्चित असलेल्या लाडक्या बहीण योजने अंतर्गत ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केले होते त्यांना १६ ऑगस्ट पासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे .परंतु ज्या महिलांनी ऑगस्ट मध्ये अर्ज केले आहेत त्यांना पैसे केव्हा मिळणार असा प्रश्न उभा राहिला आहे. याविषयी आता महत्वाची अपडेट समोर आली आहे .
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी सुरु आहे. त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील”, असं अदिती तटकरे म्हणाल्या. “लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा येत्या 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
दरम्यान , मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरु झाली. सुरुवातीला या योजनेचे अर्ज भरताना महिलांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर सरकारने यात अनेक बदल करत ही प्रक्रिया सोपी-सुटसुटीत बनवली. यानंतर असंख्य महिलांनी जुलै महिन्यात हा अर्ज दाखल केला. या सर्व महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे 3 हजार रुपये रक्षाबंधनापूर्वी मिळाले.