धक्कादायक! केंद्रीय मंत्र्याच्या घरात एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या, मुलाच्या बंदुकीतून झाडली गोळी
धक्कादायक! केंद्रीय मंत्र्याच्या घरात एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या, मुलाच्या बंदुकीतून झाडली गोळी
img
Dipali Ghadwaje
केंद्रीय मंत्र्याच्या घरात एका व्यक्तीची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मोहनलाल गंज मतदारसंघातील खासदार कौशल किशोर यांच्या निवासस्थानी एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. लखनऊ येथील त्यांच्या निवासस्थानी तरुणाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळेली अधिक अशी की, हत्या झालेल्या तरुणाची ओळख पटली असून, विनय श्रीवास्तव असं तरुणाचं नाव आहे. विनय श्रीवास्तव हा कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर याचा मित्र होता. विनय श्रीवास्तव त्यांच्यासह तिथेच वास्तव्यास होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले होते पोलिसांनी घटनास्थळावरुन सरकारी परवाना असणारी पिस्तूल जप्त केली आहे. तसंच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या ठाकूरगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील बेगरिया गावातील निवासस्थानी ही घटना घडली. येथेच विनय श्रीवास्तव याची गोळी घालून हत्या करण्यात आली. घटनास्थळी डीसीपी राहुल राज, एडीसीपी चिरंजीव नाथ सिन्हा यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, नातेवाईकांनी हत्येचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

मुलगा घटनास्थळी नव्हता - कौशल किशोर
कौशल किशोर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, मला घटनेची माहिती मिळाली आहे. पोलीस आयुक्तांना फोन करुन यासंबंधी सांगण्यात आलं. पोलीस तपास करत आहेत. आम्ही पीडित कुटुंबासह आहोत. पोलीस आपलं काम करतील. माझा मुलगा घटना घडली तेव्हा घटनास्थळी उपस्थित नव्हता. पिस्तूल सापडली असून, जप्त करण्यात आली आहे. पोलीस तपास करत आहेत. 

crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group