आजपासून जून महिना सुरु झाला असून आता नागरिकांसाठी एक मह्त्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून ल्वे, गॅस सिलिंडर ते यूपीआय मध्ये मोठे बदल होणार आहेत ते जाणून घेणे आवश्यक आहे. हे नियम काय आहेत? तुम्हाला त्याचा नेमका काय फायदा होईल? ते जाणून घेऊ या…
एलपीजी नियम
1 जून 2026 रोजी गॅस सिलिंडरचा नवा दर जाहीर होण्याची शक्यता आहे. 1 मे 2026 रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 993 रुपयांनी वाढले. त्यानंतर दिल्लीमध्ये व्यवसायिक गॅस सिलिंडरचा भाव 3,071.50 रुपयांपर्यंत वाढल्याचे पाहायला मिळाले. 1 मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.
यूपीआय नियम
यूपीआयच्या व्यवहारात कोणतीही फसवणूक होऊ नये यासाठी NPCI कडून मोठी खबरदारी घेतली जाते. यावेळी फसवणूक टाळण्यासाठी NPCI ने जून महिन्यात नवा नियम लागू करण्याचा विचार केला आहे. यापुढे यूपीआयने पैसे देताना समोरच्या व्यापाऱ्याचे व्हेरिफाईड नाव दिसेल. यूपीआय फ्रॉड कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय रेल्वेकडून मेगा ब्लॉक
जून 2026 मध्ये भारतीय रेल्वेकडून मोठा रेल्वे ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमध्ये एकूण 77 रेल्वे रद्द केल्या जाणार आहेत. तसेच अनेक रेल्वेंचे मार्ग बदलले जाणार आहेत. ट्रॅक अपग्रेडेशन आणि नॉन इंटलॉकिंगच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे.
1 जूनपासून बँकेचे नियम बदलणार
अनेक बँका 1 जून रोजीपासून आपल्या वेगवेगळ्या सेवाशुल्कामध्ये बदल करण्याची शक्यता आहे. यात एटीएम ट्रान्जेक्शन फी, फ्रई ट्रान्जेक्शन लिमीट, कॅश विदड्रॉल फी यात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे नियम काय हे समजून घेऊनच आर्थिक व्यवहार करावेत.