आजपर्यंत प्रॉपर्टीवरून झालेल्या अनेक वादाच्या घटना समोर आलाय आहेत. परंतु आता प्रॉपर्टीवरून वरून झालेला असा एक वाद समोर आला आहे कि त्यावरून आता आई आणि मुलांच्या नात्यावरील विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही. या घटनेत चक्क आईचे आकस्मिक निधन झाल्यानंतर मुलींनी दुःख व्यक्त करण्याचे सोडून प्रथम प्रॉपर्टीसाठी हट्ट धरल्याने गोंधळ उडाला होता.
तीन दिवसांपूर्वी सेवानिवृत्त पोलिस जमादारराच्या पत्नीचे छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले होते. निधनाची वार्ता दोन मुलींनाही माहिती देण्यात आली. आई रुग्णालयात मृतावस्थेत असताना मुलींनी वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे अगोदर वाटे-हिस्से करा, नंतर अंत्यविधी करा, असा अट्टहास केला. या अट्टहासामुळे नातेवाईक थक्क झाले. अखेर साखरखेर्डा पोलिस स्टेशनपर्यंत हे प्रकरण गेले.अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुलगी दागिने घेऊन गेली ठाणेदार गजानन करेवाड यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शवविच्छेदन करण्याचा सल्ला दिला. दोन्ही मुलींना समजावून सांगितले. पोलिस बंदोबस्तात त्या मातेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर ज्या मुलीला आईच्या दागिन्यांची माहिती होती, ती दागिने घेऊन निघून गेली. सर्वांचीच मने हेलावली बाकीच्यांचा मात्र आईचे दुःख व्यक्त करण्यातच वेळ गेला. आई-वडील गेल्यानंतर सर्वाधिक दुःख हे मुलींना होत असते. लहानपणापासून तिने पालनपोषण करून वाढविलेले असते. आईची माया ही मुलींमध्ये जास्त असते, हे सर्वश्रुत आहे; परंतु हा प्रकार पाहून सर्वांचीच मने हेलावली. आईच्या अंगावर २५ ते ३० लाखांचे दागिने होते.