पश्चिम बंगाल मधील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु असून सध्या तेथील राजकरणात चांगलीश उलथापालथ होताना दिसतेय. दरम्यान,आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
ममता बॅनर्जी यांना दिल्लीत झटका बसला आहे. TMC चे राज्यसभा खासदार शुखेंदु शेखर रॉय यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. खासदारकीसह पार्टीच्या सर्व पदांचा त्यांनी राजीनामा दिलाय. भ्रष्टाचाराविरुद्ध बोलल्यानंतर पक्षात मला वेगळं पाडण्यात आलं असा आरोप रॉय यांनी केला. शुखेंदु शेखर रॉय यांनी राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी जाऊन राजीनामा सोपवला. इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल बोलले की, या आघाडीचं काहीही भविष्य नाही. तृणमुल काँग्रेसमध्ये असलेल्या भ्रष्टाचारामुळे मी राजीनामा देतोय असं ते म्हणाले.
मागच्या पाच वर्षात जो भ्रष्टाचार झालाय, त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मी सरकारकडे मागणी करतो असं रॉय म्हणाले. पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवाबद्दल ते म्हणाले की, “आरजी कारच्या मुद्यामुळे नाराजी होतीच. पण त्याशिवाय अन्य मुद्यांमुळेही जनतेच्या मनात संताप होता”
तृणमुलचे दोन खासदार राज्यसभेचा राजीनामा देऊ शकतात अशी बातमी होती, त्यात शुखेंदु शेखर यांचं नाव होतं. कोयल मलिक यांचं नाव सुद्धा समोर आलेलं. त्यांना याचवर्षी एप्रिल महिन्यात तृणमुलने राज्यसभेवर पाठवलं आहे. अजून पर्यंत कोयल मलिक यांच्या राजीनाम्याची बातमी आलेली नाही.