राज्यातील घडामोडींना वेग आला असून गेल्या अनेक दिवसांपासून कांद्यावरून अनेक घडामोडी घडत आहेत. कांद्याला योच्या भाव मिळत नसल्याने राज्यात सध्या अनेक आंदोलने देखील करण्यात येत आता आता मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
कांद्याला योग्य भाव मिळत नव्हता म्हणून कांद्याचं पीक घेणारा शेतकरी त्रस्त झालेला. या कांद्याच्या मुद्यावरुन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आंदोलनं झाली. आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे.
नाफेड आणि NCCF कडून थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचा निर्णय झाला आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. कांद्याला प्रतिक्विंटल १,५८० रुपये दर नाफेड आणि nccf कडून निश्चित झाला आहे. अनेक वर्षांपासून नाफेड आणि nccf ने थेट बाजार समितीत कांदा खरेदी करावी, अशी शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून मागणी सुरु होती.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन, नाफेड, NCCF आणि बाजार समिती प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक झाली. कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा. या निर्णयामुळे कांद्याचे दर वाढण्यासाठी मदत होणार.
“अनेकदा पाठपुरावा करूनही नाफेड आणि NCCF बाजारात येऊन खरेदी करत नव्हते. आज महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. आता NCCF आणि नाफेड मार्केट मध्ये येऊन माल खरेदी करणार आहेत. भुजबळ साहेब, दादा भुसे यांच्या सूचनेनुसार काम सुरू झालं आहे. शासनाचे अधिकारी सहभागी होणार आहेत” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर म्हणाले. “सोमवार पासून 1580 नुसार नाफेड आणि NCCF शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार आहेत. हे आल्यानंतर स्पर्धा तयार होणार आहे. खराब माल खरेदी करायचा आणि तीन महिन्यानंतर सरकारला द्यायचा असा प्रकार सुरू होता” असं बनकर म्हणाले.
“एका गोष्टीला यश आलं आहे. कांदा खरेदी होणार आहे. ज्या दिवशी कांदा खरेदी झाला, त्याच दिवशी नोंद होणार आहे, शेतकऱ्यांची देखील नोंद होणार आहे. आज पर्यंत एकही कांदा नाफेड आणि NCCF ने खरेदी केलेला नाही. नाफेड NCCF मध्ये घोटाळा झाला असेल तर सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही” असं दिलीप बनकर म्हणाले.