लोकसभा निवडणुकीआधी भाजप नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये मोठा बदल
लोकसभा निवडणुकीआधी भाजप नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये मोठा बदल
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. देशभराचे लक्ष लागलेली निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांमध्ये सध्या जागावाटपाबाबत जोरदार खलबतं सुरू आहेत. तसेच निवडणुकीसाठी खास रणनिती आखण्यासोबतच मोर्चेबांधणीची कामं वेगाने सुरू आहेत. दरम्यान याच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाची निवडणूक जिंकण्याचा विश्वास भाजप व्यक्त करत आहे. त्यामुळे भाजप या निवडणुकीची खास तयारी केली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या बड्या नेत्यांच्या सोशल मीडियावर मोठा बदल करण्यात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ट्विटर वरील प्रोफाइल बदलले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रोफाईलमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यांच्या नावापुढे 'मोदी का परिवार' असा उल्लेख करण्यात आला आहे.

भाजपच्या इतर बड्या नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही हा बदल पाहायला मिळतोय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याही प्रोफाईलमध्ये हा बदल पाहायला मिळतोय.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पियुष गोयल यांनीही त्यांच्या प्रोफाइलमध्ये मोदी का परिवार असा उल्लेख केलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा बदल पाहायला मिळतोय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group