Nashik : खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन 2 मुलींचा विनयभंग
Nashik : खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन 2 मुलींचा विनयभंग
img
दैनिक भ्रमर

लासलगाव (वार्ताहर):- येथील खाजगी क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन दोन मुलींना तुम्हाला शाळेतील परिक्षेचे सर्व पेपर दाखवतो असे अमिष दाखवुन जवळीक साधुन लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी खाजगी क्लासच्या दोघांविरुद्ध विनयभंग आणि पोस्को अंतर्गत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील ग्रामपंचायत हॉल जवळील खाजगी क्लासमध्ये विद्यार्थिनी या अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील संशयित नुमान महेबुब शेख (रा. टाकळी विंचुर, ता. निफाड), सुमित संजय भडांगे (रा. गणेशनगर, लासलगाव) यांनी त्या मुलींशी जवळीक साधुन  त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरासे करीत आहेत.

बबन घोलप ठाकरेंना करणार जय महाराष्ट्र , शिंदे गटात करणार प्रवेश

लासलगाव पोलीस ठाण्यात वरील गुन्हा दाखल झाला असला तरी याबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी लासलगाव पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असे  लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी सांगितले. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group