"कार्यकर्त्यांनो तुम्ही देखील काही दिवस डोक्यावर बर्फ ठेवून घराबाहेर पडा" नेमकं काय म्हणाले अजित पवार
img
Dipali Ghadwaje
पुणे : पुण्यात महायुतीचा पहिलाच मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्या दरम्यान आजी पवार यांनी कार्यकर्त्यांना प्रेमळ दम दिलं आहे. यावेळी ते म्हणाले की, तुमच्या माझ्या घरचे लग्न नाही, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. कार्यकर्त्यांनी आपल्यापरीने सगळी कामं करायची आहे कोणीही रुसून आणि नाराज होऊन काम करु नका , त्यासोबतच कार्यकर्त्यांनी मतदार संघात कसं वागलं पाहिजे, प्रचार करताना कोणत्या पद्धतीची भाषा पाहिजे, याचे धडेदेखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. आपल्या महायुतीतील एकही कार्यकर्ता बाहेरच्या पक्षात जाणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन अजित पवारांनी यावेळी केलं आहे. 

दरम्यान 'सध्या अनेक ठिकाणी रुसवेफुगवे दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्याला बोलवलं नाही, आपला फोटो लावला नाही, या क्षृल्लक कारणावरुन रुसु नये, आपले सगळे मतभेद दूर केले पाहिजे. हे आपल्या घरचं लग्न नाही आहे. तर आपल्याला मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे', असा प्रेमळ दम त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, कार्यकर्त्यांनी आपली भाषा नीट ठेवली पाहिजे. साधारण मतदार संघात फिरताना कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारांशी आणि विरोधात असलेल्या मतदारांशीदेखील नीट वागलं पाहिजे. विरोधात असलेल्या मतदारांशी हुज्जत न घालता त्यांच्यासोबत खेळीमेळीचं वातावरण ठेवलं पाहिजे. आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी घ्या, असे अनेक धडेदेखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

'मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महायुती एकत्र आली आहे. त्यामुळे कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ्याचं बटन दाबून पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी तुम्ही कुठेही कमी पडता कामा नये', असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान  अजित पवार म्हणाले, 'रोज सात वाजता घराबाहेर पडताना तोंडात साखर ठेवून आणि डोक्यावर बर्फ ठेवून घराबाहेर पडतो. आपण आज कोणावरही चिडायचं नाही आणि आरडाओरड करायची नाही, असं स्वत:लाच सांगतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनो तुम्हीदेखील काही दिवस डोक्यावर बर्फ ठेवून घराबाहेर पडा'

इतर बातम्या
Join Whatsapp Group