"आता मॅडम नाही माँ अमृता फडणवीस" , मंगलप्रभात लोढा यांच्या "त्या" वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
img
Dipali Ghadwaje
मुंबईत अनंत चतुर्दशीनंतर दुसऱ्यादिवशी चौपाट्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जाते. विविध सामाजिक संस्था यामध्ये पुढाकार घेतात. काही सेलिब्रिटी, राजकारणी अशा मोहिमांमध्ये सहभागी होतात. 

अशातच आज मुंबईत एका चौपाटीवर असाच स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि भाजपा नेते मंगलप्रभात लोढा सहभागी झाले होते. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे.

अमृता फडणवीस यांच्या सामाजिक कार्याचे तोंडभरुन कौतुक करताना भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचा उल्लेख 'माँ' असा केला होता. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. 

“अमृता फडणवीस यांनी बीच स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतलाय, तसं त्यांनी राजकारणातील कचरा साफ करण्यासाठीपुढाकार घ्यावा” असं मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. “अमृता मॅमना मी विनंती करतो की, तुम्ही बीचवरचा कचरा साफ करता हे चांगलं काम आहे. अशीच महाराष्ट्राच्या राजकारणात घाण झालीय, ती साफ करण्यासाठी पुढाकार घ्यावा. महाराष्टाच राजकारण स्वच्छ करावं, यासाठी आपणास विनंती करतो” असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.

अमृता फडणवीस यांनी काय शपथ दिली?

“अमृताताईंनी आता माँ च रुप घेतलय. आजपासून मी त्यांना मॅम नाही, माँ अमृता संबोधणार” असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. अमृता फडणवीस यांचं कौतुक करताना ते बोलून गेले. अमृता फडणवीस सुद्धा यावेळी बोलल्या. ‘लेटस बी पार्ट ऑफ सोल्युशन, नॉट पोल्युशन’ म्हणजे प्रदूषण करायचं नाही, उपाय शोधायचा. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मी कचरा करणार नाही अशी शपथ दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group