मोठी बातमी : विधानसभेसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर;
मोठी बातमी : विधानसभेसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर; "या" नेत्यांवर मोठी जबाबदारी
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीत जबर फटका बसल्यानंतर भाजप नेते खडबडून जागे झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी वेगवेगळ्या रणनित्या आखल्या जात आहे. अशातच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपने व्यवस्थापन समिती जाहीर केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या समितीत अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. भाजपच्या व्यवस्थापन समितीत विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, विद्यमान खासदार नारायण राणे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, आमदार गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावांचा समावेश आहे.

 आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप तयारीला लागला आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा निश्चय आहे. मागच्यावेळी जिंकलेल्या 105 जागांपेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 125 जागा जिंकण्याचा भाजपने संकल्प केला आहे. 50 जागा आपण जिंकू शकतो, असा विश्वास भाजपला आहे. तर उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर आहे. भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group