विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत .अनेक नेते या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या भूमिका स्पष्ट करत आहेत. दरम्यान , वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेला ते कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार आहेत या विषयी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे . प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी लोकसभेला काँग्रेसला पाठिंबा दिला, तसेच चित्र विधानसभेतही असेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यासंदर्भात बोलताना, आगामी विधानसभेत आम्ही कुणालाही पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली.
यावेळी बोलताना, वंचित आघाडीने लोकसभेत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्याप्रमाणेच विधानसभेतही काँग्रेसला पाठिंबा देणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याबाबत बोलताना, “तेव्हा काँग्रेसने फोन करून आमच्याकडे पाठिंबा मागितला होता. मात्र, यावेळी असं काहीही नाही. विधानसभेत आमचा कोणालाही पाठिंबा नसेल. वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्ष मिळून एकत्र निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे केवळ आमच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊ, दुसऱ्या कोणालाही नाही”, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले, यांच्यासारखे राज्यातल्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात उमेदवार देणार का? असं विचारलं असता, “कोण मोठा आणि कोण छोटा हे जनता ठरवत असते. संबंधित मतदारसंघात जे कोणी इच्छूक उमेदवार असेल, त्यांचा अभ्यास करून आम्ही योग्य उमेदवार देऊ. तो मोठा आहे की लहान, हे आम्ही बघणार नाही”, असे त्यांनी सांगितलं.
दरम्यान , प्रकाश आंबेडकर हे गेल्या दिवसांपासून वेगळी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्नात आहेत