मोठी बातमी ! तिसऱ्या आघाडीतही  एमआयएमला नो एंट्री , बच्चू कडू यांची माहिती
मोठी बातमी ! तिसऱ्या आघाडीतही एमआयएमला नो एंट्री , बच्चू कडू यांची माहिती
img
दैनिक भ्रमर

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील हालचालींना वेग आला आहे . निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक पक्ष आप आपली रणनीती आखताना दिसत आहे. महाविकास आघाडीने एमआयएमला सोबत घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एमआयएम राजू शेट्टी, छत्रपती संभाजी राजे आणि बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा होती. मात्र एमआयएमला तिसऱ्या आघाडीत नो एन्ट्री करण्यात आली आहे. तिसऱ्या आघाडीचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज ही माहिती दिली. बच्चू कडू नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.बच्चू कडू यांना एमआयएमला तिसऱ्या आघाडीत घेणार का? असा सवाल करण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे. तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एंट्री आहे, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान ,  उद्या बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजी राजे आणि अन्य नेत्यांची तिसऱ्या आघाडी संदर्भात महत्त्वाची बैठक आहे. तिसऱ्या आघाडीची महाशक्ती करण्यावर या तिन्ही नेत्यांचा जोर आहे. इतरांची आघाडी आणि युती तर आमची जनतेची शक्ती राहील, असं सांगतानाच एमआयएम आणि प्रखर धार्मिकता असणाऱ्यांना आम्ही सोबत घेणार नाही. आमची लढाई धर्मापलिकडची आहे. आम्हाला एमआयएमची प्रखरता पचवणं शक्य नाही. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून आम्ही दूर राहणार आहोत, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने निफाड येथे शेतकरी मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता. या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे ओबीसी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि निफाडचे माजी पंचायत समिती उपसभापती गुरुदेव कांदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत, प्रहार जनशक्तीमध्ये प्रवेश केला. यावेळी बच्चू कडू यांनी निफाड विधानसभा मतदार संघात गुरुदेव कांदे यांची तर चांदवड विधानसभा मतदारसंघात प्रहार संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group