मोठी बातमी : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे करणार ‘या’ पक्षात प्रवेश
मोठी बातमी : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे करणार ‘या’ पक्षात प्रवेश
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे ते वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे.

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राजकीय इनिंग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे माजी पोलिस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय पांडे हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार , आज संध्याकाळी 4 च्या सुमारास संजय पांडे हे काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. संजय पांडे यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत पार पडेल.

वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचाराची सुरुवात

संजय पांडे यांनी काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर एक पोस्टही शेअर केली होती. त्यात त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात केल्याचे म्हटलं होतं. “आज वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचाराची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू…”, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

यानंतर अनेक जण संजय पांडे कोणत्या पक्षातून आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबद्दल तर्क-वितर्क लढवत होते. अखेर आता ते काँग्रेसमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group