राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याच अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत होऊ शकते.
सध्या विधानपरिषदेचे सभापतीपद 29 महिन्यांपासून रिक्त आहे. सध्या विधानपरिषदेचा कार्यभार उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे पाहत आहेत. मात्र आता विधानपरिषदेला सभापती मिळणार आहे. भाजप नेते राम शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान भाजप नेते राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महायुतीने राम शिंदे यांचे नाव निश्चित केले आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे राम शिंदे हे विधानपरिषदेचे सभापती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.