भाजपला धक्का बसण्याची शक्यता ; पुण्यातील विद्यमान आमदार तुतारी फुंकणार?
भाजपला धक्का बसण्याची शक्यता ; पुण्यातील विद्यमान आमदार तुतारी फुंकणार?
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर  राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  पुण्यातील चिंचवड मतदारसंघाच्या विद्यमान भाजप आमदार अश्विनी जगताप या शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत अश्विनी जगताप या भाजपच्या कमळ चिन्हा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. शहर भाजप पदाधिकाऱ्यांकडून मात्र अश्विनी जगताप यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

अश्विनी जगताप यांना पुन्हा उमेदवारी न देता भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत भाजप असल्याची चर्चा आहे. याची माहिती आमदार अश्विनी जगताप यांना मिळाली, त्यामुळेच त्यांना आता शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढण्याची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे.  

पुणे जिल्ह्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ जगताप कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विधानसभा मतदारसंघाचे 2008 मध्ये परिसीमन झाले, त्यात चिंचवड विधानसभा मतदारसंघात पहिली निवडणूक 2009 मध्ये झाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात लक्ष्मण जगताप पहिले आमदार म्हणून निवडून आले.

त्यानंतर 2014, 2019 मध्ये भाजपच्या तिकीटावर लक्ष्मण जगताप विजयी होत राहिले. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी चिंचवडमधून पोटनिवडणूक जिंकली. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे बंधू भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप हे चिंचवडमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group