''कुठे तक्रार करायची ती करू द्या'',  अजित पवारांच्या ''त्या'' भूमिकेवर नितेश राणे आक्रमक
''कुठे तक्रार करायची ती करू द्या'', अजित पवारांच्या ''त्या'' भूमिकेवर नितेश राणे आक्रमक
img
दैनिक भ्रमर

अजित पवार हे राज्यातील काही भाजप नेते व शिंदे गटातील नेत्यांवर नाराज आहे. त्यांनी या नाराजीबद्दल थेट दिल्लीत  भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे  तक्रार केली आहे.  यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 नितेश राणे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांना रोषाला सामोरे जावे लागते. हाच मुद्दा अनेक आमदारांनी अजित पवार यांच्या कानावर घातला. त्यावेळी आपण नितेश राणे यांची केंद्रीय स्तरावर तक्रार केल्याची माहिती त्यांनी आमदारांना दिली.

दरम्यान , यावर प्रतिक्रिया देत भाजप आमदार नितेश राणे म्हणाले, ”हिंदू समाजाने एकत्रित आले पाहिजे. एकजूटपणा दाखवला पाहिजे. हिंदू समाज एकत्रित आल्यावर काय करू शकतो हे आपण दाखवून दिले पाहिजे. आम्ही सरकारमध्येच बसलोय. हे हिंदूंचे सरकार आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. इथे भगवाच फडकणार. अजित पवारांना कुठे तक्रार करायची ती करुद्यात. मी माझ्या हिंदुत्वाशी अजितबत तडजोड करणार नाही. ”नितेश राणे यांनी सांगली येथील बत्तीस शिराळा येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाला संबोधित केले.

अजित पवारांनी कुठे तक्रार करायची ती करुद्या, त्यांनी ती करावी. पण आपण हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. विसर्जन मिरवणुकीवरील दगडफेकीचा अजित पवारांनी निषेध करायला हवा होता. मग अशी वेळ आली नसती. मी माझ्या धर्माचे काम करतोय. हिंदू म्हणून मी लढत आहे, भाजप आमदार नितेश राणे म्हणाले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group