रात्रीस बैठक चाले! शिंदे-पवारांमध्ये रात्री उशिरापर्यंत बंद दाराआड चर्चा, नेमकी कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? वाचा
रात्रीस बैठक चाले! शिंदे-पवारांमध्ये रात्री उशिरापर्यंत बंद दाराआड चर्चा, नेमकी कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? वाचा
img
Dipali Ghadwaje
आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय खलबतं होत असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सध्या कंबर कसली आहे. राज्यात महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष यांच्यात विधानसभेच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे.

महायुतीमधील प्रत्येक पक्ष आपल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. यादरम्यान बुधवरी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला गेल्याच्या माहिती समोर आली आहे.

या बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकिय निवासस्थान वर्षा येथे पार पडलेल्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत हे देखील उपस्थित होते.

दरम्यान एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तनुसार, या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीची रणनिती, जागा वाटप याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष निवडणुकीत आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर देखील यावेळी नेत्यांनी चर्चा केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसार आणि प्रचारासाठी शिवसेनेकडून बनवण्यात आलेला अहवालावरही सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group