अन् वाहन ताफा थांबवून अजित पवारांनी केली अपघातग्रस्ताची मदत, नेमकं काय घडलं?
अन् वाहन ताफा थांबवून अजित पवारांनी केली अपघातग्रस्ताची मदत, नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. शिवाजीनगर येथील निवासस्थान येथून अजित पवार हे सर्किट हाऊसच्या दिशेने जात होते. त्यावेळी संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकीस्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला.

तो अपघात बघताच अजित पवार यांनी ताफा थांबवत अपघातग्रस्त व्यक्तीची विचारपूस करीत ताफ्यातील अँब्युलन्समधील डॉक्टर यांना ताबडतोब उपचार करण्यासाठी सांगितले. त्यानंतर अजित पवार हे सर्किट हाऊसच्या दिशेने पुढील कामासाठी निघून गेले.


नेमकं काय घडलं?

या अपघातग्रस्ताना अजित पवार मदत करताना त्यांच्याशी बोलताना व्हिडिओमध्ये दिसत आहे, एक व्यक्ती अपघात झाल्यावर खाली पडल्याचं दिसतो आहे. यावेळी अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा थांबतो. अजित पवारांचे कर्मचारी, सुरक्षारक्षक अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीला येताना दिसतात. अजित पवार देखील गाडीतून उतरतात आणि कोणाला तरी फोन करून सूचना देताना दिसतात. त्यानंतर ते जखमी व्यक्तीजवळ जातात आणि त्याची विचारपूस करतात.

या अपघातात तो व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचं व्हिडिओमधून दिसते आहे. जखमी व्यक्तीला सर्व प्रकारची मदत करण्याच्या सूचना देऊन अजित पवार आपल्या पुढील नियोजित कामासाठी रवाना होतात. या व्हिडिओमधून अजित पवारांची कार्यतत्परता दिसून येते आहे, यामुळं त्यांचं कौतुक देखील केलं जात आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group