अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; 10 जणांनी गमावला जीव
अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; 10 जणांनी गमावला जीव
img
Dipali Ghadwaje
अहमदाबाद वडोदरा एक्स्प्रेसवे वर नडियादनजीक भीषण उपघात झाला आहे. यात १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. वडोदराहून अहमदाबादला जाणाऱ्या भरधाव कारने ट्रॉलरला धडक मागून धडक दिली, त्यामुळेही भीषण दुर्घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने टँकरला धडक दिल्याने हा अपघात झाला. ही कार वडोदराहून अहमदाबादला जात होती. कारमधील सर्व 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 8 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. 

अपघाताची माहिती मिळताच 108 च्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. याशिवाय एक्स्प्रेस हायवे पेट्रोलिंग टीमही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. अपघातामुळे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. नडियादजवळ ही घटना घडली.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group