राज्यातील अनेक महामार्गांचे चौपदरीकरण, सहा पदरीकरण झाले. एक्सप्रेस हायवे ही निर्माण करण्यात आले. मात्र अपघातांच्या प्रमाणात होणारी वाढ ही चिंतेची बाब ठरत आहे. एकीकडे रस्ता रुंदीकरण करून चांगल्या दर्जाच रस्ते तयार केली जात असतानाही अपघात होतात आणि दुर्दैवाने त्यात अनेकजण मृत्युमुखी पडतात.

याबाबत राज्य सरकारने अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य पावले उचलत तांत्रिक दृष्ट्या संबंधित महामार्गावर काय त्रुटी आहे हेही दूर करण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. परंतु त्यावर पुढे फारसं काही काम झाले नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही
अनेक महामार्गावरील घटना या राज्या सरकारसाठी चिंतेची बाब ठरली आहे. अशातच आज मुंबई गोवा महामार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात अपघात झाला. क्रेन वाहतूक करणारा कंटेनर कलंडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कलंडलेल्या कंटेनर मुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक कोंडी झाली आहे.