विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस उलटली ; सहा विद्यार्थी गंभीर जखमी
विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस उलटली ; सहा विद्यार्थी गंभीर जखमी
img
Dipali Ghadwaje
बेळगावात गोकाक तालुक्यात स्कूल बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीये . स्कूल बस उलटल्याने  सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाली आहे. तर काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे. बसचं स्टेअरींग लॉक झाल्यानं अपघात झाला  जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गोकाक तालुक्यातील गोकाक पाच्छापूर मार्गावरील मेलीमर्डी क्रॉस येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

मावनूर,गोडचीनमलकी आणि मेलमट्टी या गावातील विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस मरडीमठ गावाकडे निघाली होती. बसचे स्टेरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. बस उलटल्यावर विद्यार्थी घाबरून गेले आणि त्यांनी एकच आकांत केला. अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून त्यांना धीर दिला.  

बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने बस उलटल्याची माहिती
दरम्यान या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी गोकाक येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. बस उलटल्याने सर्वच विद्यार्थी भयभीत झाले. मात्र तातडीने सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित खाली उतरवले आहे.  अपघातात काही विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. तर सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयाच हलवण्यात आलं आहे. बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने बस उलटल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळच्या सुमारास स्कूल बस उलटून ही दुर्घटना घडली.  अपघाताची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत. जेव्हा ही बस उलटली तेव्हा बसमध्ये किती विद्यार्थी होते अद्याप याची माहिती समोर आलेली नाही. 

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि विद्यार्थ्यांचे पालक घटनास्थळी पोहोचले. सध्या रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांचा उपचार सुरु आहे. उपचार ही प्राथमिकता असून त्यानंतर या घटनेचा संपूर्ण तपास केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group