राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या गाडीचा अपघात; एकाचा मृत्यू, ३ गंभीर जखमी
राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या गाडीचा अपघात; एकाचा मृत्यू, ३ गंभीर जखमी
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या गाडीचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची गाडी उलटल्याने चालकाचा मृत्यू झाला. तर पाच कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत.

नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू वाहतूक होत असल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग नेहमीच कारवाई करतो. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांच्या मदतीने देखील वेगवेगळी कारवाई सुरूच असते. तरीही जिल्ह्यातून सुरू राहणारी अवैध दारू वाहतूक ही काही बंद होत नाही. या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने भरारी पथके तयार करण्यात आली असून अशाच भरारी पथकाचा अपघात झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड-लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या दृष्टीने सीमा शुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्यासाठी सीमा शुल्क विभागाच्या वाहनात पाठलाग करत असताना सीमा शुल्क विभागाचे वाहन हरणुल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले.

त्यात सीमा शुल्क विभागाचे चालक कैलास  कसबे हे जागीच ठार झाले. तर लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेचा पोलीसाकडुन कसून तपास सुरु आहे. लवकरच याबाबत माहिती दिली जाईल, असे पोलिस अधिकारी यांच्यावतीने सांगण्यात आले.इतर बातम्या
Join Whatsapp Group