शेतातून घरी जाताना काळाची झडप ! भरधाव ट्रकने पाच महिलांना ट्रकने चिरडले
शेतातून घरी जाताना काळाची झडप ! भरधाव ट्रकने पाच महिलांना ट्रकने चिरडले
img
Dipali Ghadwaje
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये एका भरधाव कारने ९ मजुरांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच सांगोल्यामधून एक भयंकर दुर्घटना समोर आली आहे. 

सांगोल्यामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सांगोला तालुक्यातील पंढरपूर कराड मार्गावर भरधाव ट्रकने पाच महिलांना चिरडल्याची घटना घडली. शेतातून काम करून घराकडे जाताना हा भयंकर अपघात झाला.  

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंढरपूर- कराड महामार्गावर एका भरधाव ट्रकने पाच महिलांना चिरडल्याची घटना घडली. सांगोला तालुक्यातील कटपळ गावच्या या महिला शेतातून घरी निघाल्या होत्या. यावेळी रस्त्यावर एका भरधाव ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या भयंकर अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group