लग्नावरुन परत येताना काळाचा घाला ; व्हॅन-ट्रकची धडक, ९ जणांचा मृत्यू
लग्नावरुन परत येताना काळाचा घाला ; व्हॅन-ट्रकची धडक, ९ जणांचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर
राजस्थानच्या झालावाडमध्ये भीषण अपघात झाला आहे. व्हॅन आणि ट्रकची जोरदार धडक झाली. यामध्ये 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. अपघातात जीव गमावलेले लोक मध्य प्रदेशातून येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. सध्या मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात ठेवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, झालावाड येथे झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. येथे भरधाव वेगाने जाणारी मारुती व्हॅन आणि ट्रक-ट्रॉली यांच्यात जोरदार धडक झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेले लोक मध्य प्रदेशातून एका लग्न समारंभात सहभागी होऊन परतत होते.

जेव्हा हे लोक झालावाडमधील राष्ट्रीय महामार्गावर (NH 52) अकलेराजवळ पोहोचले तेव्हा हा भीषण अपघात झाला. आजूबाजूच्या लोकांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून स्थानिक पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक काही वेळातच घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. मृतदेह अकलेरा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. अकलेरा पोलीस घटनास्थळी हजर आहेत. या घटनेची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचल्यानंतर पुढील तपास करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group