दुर्दैवी..! उड्डाणपुलावरुन दुचाकी थेट खाली, दोघांचा जागीच मृत्यू
दुर्दैवी..! उड्डाणपुलावरुन दुचाकी थेट खाली, दोघांचा जागीच मृत्यू
img
Dipali Ghadwaje
मुंबई : मुंबईत झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण शहर हादरलं आहे. मुंबई उपनगरातील गोरेगाव पूर्व-पश्चिमेला जाणाऱ्या उड्डाणपुलावरून दुचाकी थेट खाली कोसळली. तब्बल 20 फुट खाली दुचाकी कोसळली. त्यामुळे गाडीचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला होता, तर दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या दोघांचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , अपघातात वैभव गमरे आणि आनंद इंगळे यांचा मृत्यू झाला आहे. 

गोरेगावात दुचाकी पुलावरुन कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर दोघांना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 

याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दुचाकीच्या अपघातात वैभव गमरे (28) आणि त्याचा मित्र आनंद इंगळे यांचा मृत्यू झाला आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास दुचाकीनं  जाताना उड्डाणपुलावरून कोसळून दोघांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात दुचाकीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. दरम्यान, दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी गोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group