जिलेटीनच्या स्फोटात मृत्यू: बघा कुठे घडली घटना
जिलेटीनच्या स्फोटात मृत्यू: बघा कुठे घडली घटना
img
Jayshri Rajesh
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी बसस्थानकाच्या बाजूला विहिरीचे काम चालू असताना अचानक जिलेटिन चा स्फोट होऊन सहा जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. त्यातील तीन जणांचा उपचाराच्या मृत्यू झाला असून एकाची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे तर जखमी दोघांवरती न्यू मेडिकल हॉस्पिटल श्रीगोंदा या ठिकाणी उपचार सुरू आहेत. 

 श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी बसस्थानका पासून काही अंतरावर शेडगाव रोड नजीक विहिरीचे काम चालू होते त्या विहिरीत काम करत असताना सुरुवातीला जकम्बर च्या साह्याने जिलेटीन साठी होल करण्यात आले त्या हॉलमध्ये जिलेटीनच्या कांड्या भरल्यानंतर बऱ्याच वेळाने पाणी साचल्यावर पाणी करण्यासाठी त्या विहिरीमध्ये मोटार सोडली असता मोटार फॉलटी असल्याने जिलेटीनच्या सर्वच विद्युत प्रवाह मिळून कांड्यांचा स्फोट होऊन स्फोटात विहिरीतून सर्वजण बाहेर फेकले गेले. 

 यामध्ये तब्बल सहा जण गंभीरित्या जखमी झाले आहेत यामध्ये जबर सुलेमान इनामदार - वय 32 सुरज चुसुफ इनामदार-वय25, गणेश नामदेव वाळुंज वय 36, वामन गेना रणसिंग वय 70,रवींद्र गणपत खामकर वरील सर्व राहणार टाकळी कडे ता श्रीगोंदा नागनाथ भालचंद्र गावडे वय 29 रा बारडगाव सुद्रीक ता कर्जत हे गंभीरपणे जखमी झाले त्यांना उपचारासाठी श्रीगोंदा शहरातील न्यू मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचाराच्या दरम्यान सुरज चुसुफ इनामदार-वय25, गणेश नामदेव वाळुंज वय 36 हे मयत झाले असून जबर सुलेमान इनामदार याची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे तर उर्वरित वामन घेणारं सिंग व रवी गणपत खामकर किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर न्यू मेडिकल हॉस्पिटल श्रीगोंदा या ठिकाणी उपचार सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group