......तर वाहन चालकांना भरावा लागेल प्रतिदिन 50 रुपये दंड
......तर वाहन चालकांना भरावा लागेल प्रतिदिन 50 रुपये दंड
img
Dipali Ghadwaje
सोलापूर : वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास आता केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८१च्या नियम ८१ नुसार प्रतिदिन ५० रुपयांचा दंड लावला जाणार आहे. ज्या वाहनांचा फिटनेस संपला आहे किंवा अनफिट आहेत, त्या वाहनांना आता आपोआप ऑनलाइन सिस्टिममध्ये दररोज दंड लागणार आहे. त्यामुळे वाहन मालकांना आता वेळेतच वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागणार आहे. 

सोलापूरसह राज्यभरात अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दरवर्षी शहर- ग्रामीणचे वाहतूक पोलिस, आरटीओ अधिकारी व महामार्ग पोलिसांच्या माध्यमातून आणि ई-चालानद्वारे बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यातून कोट्यवधींचा दंड आकारला जातोय. तरीपण, २०२२ मध्ये झालेल्या ३३ हजार ३८३ अपघातांमध्ये १५ हजार २२४ तर २०२३ मध्ये झालेल्या ३५ हजार २४३ अपघातांमध्ये १५ हजार ३६६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

महामार्गांवर बेशिस्तपणे थांबलेली वाहने, अतिवेग, मद्यपान, अनफिट वाहने अशी अपघात वाढीची प्रमुख कारणे आहेत. या पार्श्वभूमीवर आता वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपताच तत्काळ त्याचे नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे, अन्यथा संबंधित वाहन मालकाला प्रतिदिन ५० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

वाहनाच्या कामासाठी त्यावेळी तो आरटीओ कार्यालयात येईल, त्यावेळी तो दंड भरल्यावरच त्याचे काम मार्गी लागणार आहे. तर त्या मुलाला २५ वर्षांपर्यंत लायसन्स नाहीच अल्पवयीन मुलगा किंवा मुलीच्या हाती दुचाकी किंवा अन्य वाहन दिल्यास त्या अल्पवयीन मुला-मुलीला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मिळत नाही. दुसरीकडे अल्पवयीन मुलाच्या पालकांवर आणि वाहन मालकावरही दंडात्मक कारवाई होईल. या कारवाईतील एकूण दंड २५ हजारांपर्यंत आहे. 

त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नयेत, असे आवाहन आरटीओ अधिकाऱ्यांनी केले आहे. अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांनाही आता एक ते दोन हजारांचा दंड होणार आहे.

दंड ऑनलाइन पद्धतीने होणार 

ज्या वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपली आहे, त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्याचे नूतनीकरण करून घ्यावे. वाहनचालक जेवढा विलंब करतील, त्यानुसार त्यांना दररोज ५० रुपयांप्रमाणे दंड द्यावा लागणार आहे. ऑनलाइन पद्धतीने फिटनेस संपलेल्या त्या वाहनांना आपोआप दंड लागणार आहे. 

- अमरसिंह गवारे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर 
इतर बातम्या
Join Whatsapp Group