लाच घेताना मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात
लाच घेताना मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात
img
Dipali Ghadwaje
नाशिक :- 5 हजारांची लाच मागून 4 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिकेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. श्रीमती अर्चना बापूराव जगताप (वय 39), पद - मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, अक्कलकोस तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे, (रा. अभिनव रो हाऊस क्रमांक 10 , गुलमोहर हाइट्स च्या मागे,मखमलाबाद रोड नाशिक) असे लाच घेणाऱ्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांचे गट विमा योजनेचे देयक रुपये 1 लाख 33 हजार हे प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांनी मंजूर केले होते. या देयकाचे आहरण व संवितरण करण्याचे काम अर्चना जगताप यांच्याकडे होते.

त्यामुळे तक्रारदार यांनी वेळोवेळी जगताप यांच्याकडे थकीत एकाकरिता पाठपुरावा केला. तेव्हा जगताप यांनी तक्रारदार यांच्याकडे सदरचे देयक मिळवून देण्यासाठी 5 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. ही लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे पुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पो.ह. राजन कदम, संतोष पावरा, पो.शि. रामदास बारेला, प्रशांत बागुल, पो.ह. चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.
crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group