एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले आमदार पिता-पुत्र उद्धव ठाकरेंच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात खळबळ
एकनाथ शिंदेंबरोबर गेलेले आमदार पिता-पुत्र उद्धव ठाकरेंच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात खळबळ
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडीने चांगलाच धक्का दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या अनेक आमदारांना पुन्हा ठाकरेंसोबत येण्याचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अशातच एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार माजी आमदार गोपीकिशन बजोरीया आणि त्यांचे पुत्र आमदार विप्लवबजोरीया यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या 40 आमदारांची साथ सोडली होती. त्यामुळेशिवसेनेत मोठी फुट पडली. यानंतर न्यायलयातील घडामोडींनंडीं नंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले आणखी काही आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदेयांच्याबरोबर गेले होते.यामध्ये माजी आमदार गोपीकिशन बजोरीया आणि त्यांच्या पुत्र आमदार विप्लव बजोरीया यांचाही समावेश होता.

दरम्यान एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार माजी आमदार गोपीकिशन बजोरीया आणि त्यांचे पुत्र आमदार विप्लवबजोरीया यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. असे असले तरी उद्धव ठाकरे यांनी या पिता-पुत्रांना पक्षात घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान  ठाकरे यांनी बजोरीया यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे आमदारांसाठी परतीचे दोर कापल्याचा संदेश दिला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले.महविकास आघाडीच्या माध्यमातून लढत असताना त्यांनी 40 आमदार 13 खासदार सोडून गेलेले असताना पुन्हा9 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे राज्यात अजूनही ठाकरेंना मानणारा वर्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसभेच्या निकालांमुळे ठाकरेंना सोडून गेलेल्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू असल्याची चर्चा आहे. राज्यात येत्या तीन महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्याराजकारणात मोठ्या उलथापालथी पाहायला मिळू शकतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group