अजित पवारांची पुण्यात मोठी घोषणा; म्हणाले आगामी...
अजित पवारांची पुण्यात मोठी घोषणा; म्हणाले आगामी...
img
दैनिक भ्रमर
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवण्यावर ठाम आहेत. 

पुण्यात आज भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार पडत आहेत. पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातून अजित पवारांनी मोठी घोषणा खेळू. ते म्हणाले, यावेळी लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढायच्या आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

त्यामुळे, महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच असल्याचं सूचक विधान त्यांनी केले आहे. विधानसभा निवडणुका ऑक्टोबर शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिला आठवड्यात होतील, असे अजित पवारांनी म्हटले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group