विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर असून सध्या ते मराठवाड्यात आहेत. रम्यान काल बीडमध्ये शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा ताफा अडवत गोंधळ घातला होता. त्यानंतर माझ्या वाट्याला जाऊ नका अन्यथा विधानसभा निवडणुकीत एकही सभा घेऊ देणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला दिला होता.
त्यावर आता ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. ज्या गावच्या बाबळी त्या गावच्या बोरी, असं म्हणतं. हे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दोन दगड मारण्यासाठी असतं. हे मोहोळ ज्या सुपारी आहेत त्या वाजवण्यासाठी असतं, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, अशी हल्लाबोल राज ठाकरेंवर केला आहे.
अंबादास दानवे काय म्हणाले?
शिवसेनेला असं करण्याची गरज नाही, उलट आरोप आम्हालाही करता येतो, तुम्हीच भाजप आणि शिंदे गट यांच्याआडून सगळं राजकारण करता, असं आम्ही म्हणायचं का? हा माझा सवाल आहे. माझं मोहळ उठल तर विधानसभेला सभा घेता येणार नाही असं राज ठाकरे म्हणाले आहेत, मात्र ज्या गावच्या बाबळी त्या गावच्या बोरी, हे मोहोळ फक्त टोलनाक्यावर दोन दगड मारण्यासाठी असतं. ज्या सुपारी आहेत ते वाजवण्यासाठी असतं,हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, असा टोला लगावला आहे. जरांगेंच्या आडून विधानसभेसाठी ठाकरे , पवार कधीही राजकारण करणार नाहीत. असं कुठे असेल, तर ते सिद्ध करून दाखवावं. असे धंदे शिवसेना कदापि करणार नाही.
मात्र राज ठाकरे यांनी अजित पवार कधीच जातीच राजकारण करणार नाही असं म्हटलं आहे. हा साक्षात्कार आता घडलेला आहे त्यांना. त्यांच्या मागच्या काळातल्या सर्व भूमिका पाहिलेल्या आहेत, त्याचं आपल्याला स्पष्टीकरण मिळेल. काल बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवला ते शिवसैनिक जरूर होते. मात्र आंदोलन शिवसेनेचं नव्हतं. मराठा आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा ताफा अडवण्यात आला होता. सगळ्या पक्षांचे मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या आंदोलनात होते, असही दानवे यांनी म्हटलं आहे.