मोठी बातमी ! सुप्रिया सुळेंचा मोबाईल आणि व्हॉटस्अ‍ॅप हॅक, केलं मोठं आवाहन
मोठी बातमी ! सुप्रिया सुळेंचा मोबाईल आणि व्हॉटस्अ‍ॅप हॅक, केलं मोठं आवाहन
img
दैनिक भ्रमर
राजकीय  वर्तुळातून  मोठी बातमी समोर आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि वॉट्सअप हॅक करण्यात आलं आहे. त्याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या ट्वीटर वरून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये 'माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी.' असं त्यांनी म्हटलं आहे. 

शिवाय , सुप्रिया सुळे यांचा जनसंपर्क मोठा आहे. तसेच, त्या सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असतात. कार्यकर्त्यांचे मोबाईलवर येणारे फोन आणि मेसेजलाही त्या आवर्जून रिप्लाय करत असतात. मात्र त्यांचा फोन आणि वॉट्सअप हॅक झाल्याचे त्यांना रविवारी दुपारी लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती सोशल मीडियावरून आपल्या कार्यकर्त्यांना दिली आहे. 

दरम्यान , तंत्रज्ञानामुळे आपली कामं सोपी झाली. क्षणारार्धात कोणाशीही कधीही मोबईद्वारे आपल्याला सहज संपर्क साधता येतो.  मात्र आता याचा तोटा म्हणजे मोबाईल हॅकिंगचा धोका देखील वाढला आहे. या हॅकिंगचा फटका आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील बसला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group