अकोल्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची चूक समोर आलीय. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा मुख्य राष्ट्रीय महामार्गावर लागला तरी फडणवीसांच्या सुरक्षा यंत्रनेतील पोलिसांचा ताफा हा कृषी विद्यापीठातच होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची ही मोठी चूक समोर आली आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. एकदोन ठिकाणी राजकीय नेत्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचंही समोर आलं आहे. अशात एक मोठी घटना समोर आली आहे. अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रनेची चूक समोर आली. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा मुख्य राष्ट्रीय महामार्गावर लागला तरी फडणवीसांचा सुरक्षा यंत्रणेचा पोलिसांचा ताफा हा कृषी विद्यापीठातच होता. सुरक्षा यंत्रणेची ही मोठी चूक समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या विश्रामगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार, असं सुरक्षा यंत्रणेला वाटलं होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे वाहन थेट मुख्य महामार्गावर लागल्याने त्यांच्या ताफ्यातील मागील सुरक्षा यंत्रणेचा ताफा हा मागेच राहिला. यात पोलिसांचे वाहन आणि ॲम्बुलन्स इतर वाहने मागेच राहिले होते. याआधीही देवेंद्र फडणीस यांच्या ताफ्यामध्ये अकोल्यात चूक झाली होती. आता पुन्हा अकोल्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरक्षा पुरवणाऱ्या यंत्रणेची चूक समोर आली आहे. त्यांनतर काही काळ पोलिसांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता.