काळजी घ्या!  ''या'' शहरात 24-25 ऑगस्ट रोजी  मुसळधार पावसाचा इशारा
काळजी घ्या! ''या'' शहरात 24-25 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा
img
दैनिक भ्रमर
राज्यात जुलै महिन्यात पावसाने जोरदार एन्ट्री केली होती . त्यानंतर   गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस थोडा थंडावला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा कमबॅक होणार असून पावसाचा जोर वाढत असल्याचे दिसत आहे. कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्यात पुन्हा पावसाची रिमझिम सुरु झाली आहे. आता संपूर्ण मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान , येत्या 24-25 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज राज्यभरात विजांसह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागांमध्ये मंगळवारपर्यंत वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group