नाशिक :- किरकोळ कारणावरून 16 वर्षीय मुलाने एका इसमावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सीबीएस येथील सम्राट हॉटेल जवळ घडली. जखमी इसम हा फिरस्ता आहे. त्याला या बालकाने एका इसमा विषयी माहिती विचारली. यावर जखमी इसमाने "मी तुझ्या बापाचा नोकर आहे काय? तुला काय करायचे" असे म्हणुन शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने त्यास फुटपाथवर असलेल्या सिमेंटचा गट्टु (पेव्हर ब्लॉक) उचलुन त्याचे तोंडावर व डोक्यात मारून त्यास जखमी केले.

मुलाच्या डाव्या हाताच्या करंगळीस दुखापत झाली आहे. फिरस्ता इसम हा सुमारे 40 वर्षांचा असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. तो बेशुद्ध असल्याने त्याचे नाव समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्यास सरकारवाडा पोलिसांच्या हवाली केले आहे.