ड्रायडेला चक्क आमदाराच्याच लेकाच्या बारममधून अवैध दारू विक्री !
ड्रायडेला चक्क आमदाराच्याच लेकाच्या बारममधून अवैध दारू विक्री !
img
दैनिक भ्रमर
30 जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते. हा दिवस हुतात्मा दिन म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात ड्राय डे असतो. ड्राय डे दिवशी मद्यविक्री करण्याला बंदी असते. मात्र राज्य सरकारची बंदी झुगारून एका आमदाराच्या लेकाने चक्क अवैध दारू विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांच्या पराक्रमी लेकावर ड्राय डेच्या दिवशी अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी येथे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांचे बिअर बार आहे. 30 जानेवारी रोजी ड्राय डे असताना सुद्धा या बियर बारमधून देशी विदेशी दारूच्या बॉटल्स विकताना गजानन गोतमारे या इसमास रंगेहात अटक करण्यात आली. आमदार गजानन लवटे यांचे पुत्र विनय लवटे यांनीच आपल्याला या दारूच्या बॉटल्स विक्रीसाठी दिल्याची कबुली दिली. यावरून गजानन गोतमारे व आमदार पुत्र विनय गजानन लवटे या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group