''या''  कारणास्तव निवडणूक आयोगाला हायकोर्टाने बजावली नोटीस
''या'' कारणास्तव निवडणूक आयोगाला हायकोर्टाने बजावली नोटीस
img
दैनिक भ्रमर
राज्यात महायुती सरकारने ऐतिहासिक विजय प्राप्त केला असून महाविकास आघाडीला मात्र दारुण पराभव सहन करावा लागला तसेच इतर पक्षांनाही या निवडणुकीत मोठा धक्का सहन करावा लागला आहे. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकालावरून विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. आता याचदरम्यान, निवडणूक आयोगाला कोर्टाने नोटीस बजावली आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून आजही संशय व्यक्त केला जात आहे. निवडणुकीत वाढलेल्या मतदानावरून आयोगाकडून अजूनही खुलासा झालेला नाही. अशातच वंचित आघाडीचे सर्वेसर्वा आणि अॅड प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल हायकोर्टाने घेतली आहे. हायकोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना नोटीस बजावली असून 2 आठवड्यात खुलासा सादर करावा असे निर्देश कोर्टाने दिले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात मतदान कसं वाढलं याबद्दल हायकोर्टात याचिका दाखल आहे. आज न्यायमूर्ती अजय गडकरी,न्यायमूर्ती कमल खाता यांच्या द्विसदस्य खंडपीठासमोर सुरू सुनावणी आहे. आज सुनावणी दरम्यान, एका आरटीआयमध्ये निवडणूक आयोगाकडे तशी मागणीही झाली होती. पण महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 मधे 76 लाख मतांचा डेटा आमच्याकडे उपलब्ध नाही, असं उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलं होतं. एवढंच नाहीतर सायंकाळी 5 ते 6 या वेळेत झालेल्या 76 लाख मताचा डाटा अर्थात Pre Numbered slip केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे वाढलेलं 76 लाख मतांचा हिशेब नाही का? असा सवाल ऍड प्रकाश आंबेडकर यांनी केला.

निकालाची घोषणा करताना मतांची जुळवणी व्हायला हवी. ती झाली असेल तर सर्व निवडणूक आयोगाकडे पाठवायला हवी. जिकडे मतं जुळत आहे का याचा रेकॉर्ड आयोगाला पाठवावे. यासाठी हायकोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. २ आठवड्यात उत्तर द्यावं लागणार आहे. ही नोटीस निवडणूक आयोगाचे आयुक्तांना बजावली आहे.

तसेच, सायंकाळी 6 च्या नंतर झालेलं मतदान कसं करून घ्यायचं यावर नियामवली आहे. ती पद्धत वापरली गेली का यावर आम्हाला उत्तर हवं आहे. पण आयोग आम्हाला सांगत आहेत की माहिती उपलब्ध नाही. आम्ही बॉल रोल केला आहे राजकीय पक्षाने आणि जनतेने सहभाग घेतला तर निवडणूक आयोगाने कृती करावी. निवडणूक आयोग जर म्हणतंय पारदर्शक मतदान झालेलं आहे, तर मग मतदान कसं झालंय ते आम्हाला कळवावं, अशी मागणीही प्रकाश आंबेडकरांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group