उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये महिलेला केलं किस ? व्हिडीओ झाला व्हायरल
उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये महिलेला केलं किस ? व्हिडीओ झाला व्हायरल
img
दैनिक भ्रमर
दिग्गज गायक उदित नारायण हे अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत. आजवर त्यांनी आपल्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, त्यांच्या मनावर राज्य केलं आहे. पण, सध्या मात्र उदित नारायण एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. लाईव्ह शो सुरु असताना उदित नारायण यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या ओठांवर उदित नारायण यांनी किस केलं. शोमधील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये किती तथ्य आहे  ते समोर आलेलं नाही.

उदित नारायण यांचे व्हायरल होणारे व्हिडीओ फेक आहेत. असं अनेकांचं म्हणणं आहे. तर अनेकांनी मात्र त्यांच्यावर संताप व्यक्त केली आहे. व्हायरल व्हिडीओनुसार, उदित नारायण ‘टिप टिप बरसा’ गाणं गात आहेत. तेव्हा एका महिला चाहत्यांनी उदित नारायण यांना घेरलं आणि त्यांच्यासोबत सेल्फी क्लिक करु लागल्या. याच दरम्यान उदित नारायण यांनी एक महिलेला किस केल्याचं दिसत आहे.

दरम्यान, उदित नारायण यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर व्हायरल होत असलेला व्हिडीओ फेक असून AI जनरेडेट आहे… असं देखील अनेकांचं म्हणणं. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उदित नारायण यांचे चाहते म्हणाले, ‘उदित नारायण असं करु शकत नाही. कदाचित AI असू शकतं.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘व्हिडीओ AI आहे असं कृपया म्हणा…’, सध्या सोशल मीडियावर उदित नारायण यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. पण यावर उदित नारायण किंवा त्यांच्या कुटुंबियांनी मौन बाळगलं आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group