अक्षय शिंदेच्या वकिलांनी  केला ''हा'' गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले ?
अक्षय शिंदेच्या वकिलांनी केला ''हा'' गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले ?
img
दैनिक भ्रमर
बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. दरम्यान या घटनेचा सर्वच स्थरांतून निषेध करण्यात आला. दरम्यान, या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. यानंतर अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करण्यात आला होता. या घटनेनंतर आज कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनी एक धक्कादायक खुलासा केला.


अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना धमकावले जात आहे. यामुळे ते प्रचंड दबावात आहेत, असा खुलासा अमित कटारनवरे यांनी केला. तसेच , ठाण्यातून काही तरी गौड बंगाल होतेय, योग्य वेळी मी दबाव टाकणाऱ्यांची नावे सांगणार  असे ते म्हणाले . अमित कटारनवरे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  यावेळी त्यांनी सविस्तर  माहिती दिली.


 “गेल्या 20 तारखेला जी ऑर्डर झाली, त्यात कोर्टात 4 पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवलं आहे. यात गुन्हा दाखल न केल्यामुळे याचिकेकर्त्याने धमकवलंय अशी मला माहिती मिळाली आहे. त्यामुळे ते प्रचंड दबावात आहे. जे काय पुरावे होते त्याच्या आधारे मला एनओसी मागितली होती. तेव्हा मी माझ्या क्लायंटला विचारलं त्यांनी सांगितलं फसवून सही घेतली होती. हे काय सुरू आहे ते तुम्हीच तपास करा”, असे अमित कटारनवरे म्हणाले. 

“अण्णा बोलले सही माझी होती. मात्र मला हेच वकील हवे आहेत. लेटर आलं होत लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आलं. ज्या वेळेला डॉक्युमेंट टेंडर करायचं असतं, क्लायंट लागतात. ते आजच मला भेटले ते इतके दिवस दिसले नव्हते. ठाण्यातून हे रजिस्टर्ड पोस्ट आलंय. इंग्लिश मधून आलंय. त्यांना इंग्लिश येत नाही. याची शहानिशा केली. तर ते म्हणाले आम्हाला तुम्हीच वकील हवे आहात. ठाण्यातून काही तरी गौड बंगाल होतेय, योग्य वेळी मी दबाव टाकणाऱ्यांची नावे सांगणार आहे. सुन आणि नातवाला धमकी मिळत असेल. ते गावी निघून गेले”, असेही अमित कटारनवरे यांनी म्हटले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group